भाजलेल्या जखमांवर उपचार करणारे 'स्मार्ट बँडेज' (Smart Bandage)

  • संशोधन संस्था न्यूकॅसल युनिव्हर्सिटी (Newcastle University), लंडन येथील संशोधक
  • तंत्रज्ञान/स्वरूप प्लाझ्मा-आधारित हायड्रोजेल 'स्मार्ट बँडेज' (Plasma-based Hydrogel Smart Bandage)
  • प्रमुख वैशिष्ट्य जिथे पारंपरिक पट्ट्यांमुळे ७ दिवसांत केवळ ५०% जखम भरून निघते, तिथे या स्मार्ट बँडेजमुळे अवघ्या ७ दिवसांत तब्बल ९०% पर्यंत जखम भरून येते.
  • रचना (Structure) याची बनावट हुबेहूब मानवी टिश्यूजसारखी (उती) आहे. हे प्लाझ्मा इंजिनिअरिंगच्या मदतीने लवचिक पॉलिमर बँकिंग (Flexible Polymer Backing) आणि सॉफ्ट हायड्रोजेलच्या (Soft Hydrogel) मिश्रणातून बनवले गेले आहे.

इतर उपयोग (Other Applications)

  • हे बँडेज केवळ भाजल्यामुळे झालेल्या जखमांवरच नाही, तर मधुमेह (Diabetes) किंवा इतर आजारांमुळे होणाऱ्या जुनाट आणि गंभीर जखमांवर (Chronic Wounds) उपचारासाठी देखील उपयुक्त ठरेल.

भारताच्या दृष्टीने महत्त्व (Context for India)

वार्षिक बर्न इंजरी रुग्ण (भारत)
दरवर्षी सरासरी ७० लाख व्यक्ती भाजल्यामुळे जखमी होतात.
गंभीर रुग्ण
यातील सुमारे ७ लाख गंभीर रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागते.
बेड्सची उपलब्धता
देशभरात बर्न केअरसाठी केवळ १,३३९ बेड्स उपलब्ध आहेत.
फायदा
स्मार्ट बँडेजमुळे रुग्णांचा बरे होण्याचा वेग वाढल्याने रुग्णालयांवरील आणि बेड्सवरील ताण कमी होण्यास मदत होईल.